तालुका शिक्षक पतसंस्थेने सभासदांची पत, प्रतिष्ठा वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST2021-02-09T04:35:53+5:302021-02-09T04:35:53+5:30
कळंब : तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने आजपर्यंत शिक्षक सभासदांची पत व प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य करून राज्यात लौकिक निर्माण केला ...

तालुका शिक्षक पतसंस्थेने सभासदांची पत, प्रतिष्ठा वाढवली
कळंब : तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने आजपर्यंत शिक्षक सभासदांची पत व प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य करून राज्यात लौकिक निर्माण केला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केले.
संस्थेच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ टकले, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष एल. बी. पडवळ, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा अनुराधा देवळे, रामकृष्ण मते, शिक्षणविस्तार अधिकारी मधुकर तोडकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने, कार्याध्यक्ष श्रीनिवास गलांडे, कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, भूमचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, बाळासाहेब कुटे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, शेषेराव राठोड, राजेंद्र बिक्कड उपस्थित होते.
तांबारे म्हणाले, या पतसंस्थेने सभासदांसाठी शुभमंगल कन्यादान, सभासदाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संपूर्ण कर्जमाफी, गुणवत्ता वाढीसाठी विशेष कृती कार्यक्रम, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव, सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान यासारख्या कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. संस्थेकडे सभासदांनी ५ कोटी पेक्षा जास्त मुदतठेवी ठेवून संचालक मंडळावरील विश्वास दृढ केला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ४३ कोटींपेक्षा जास्त असून, ती जिल्ह्यातील इतर शिक्षकांच्या पतसंस्थेपेक्षा अधिक आहे.
कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भूषण नानजकर, संचालक भक्तराज दिवाने, शिवराज मेनकुदळे, चंद्रकांत शिंदे, सतीश येडके, पांडुरंग वाघ, तौफिक मुल्ला, दशरथ मुंढे, अविनाश पवार, धनाजी अनपट, नागेश टोणगे, गणेश कोठावळे, वैशाली क्षीरसागर, ज्योती ढेपे आदींनी पुढाकार घेतला. अहवाल वाचन सचिव संतोष ठोंबरे यांनी केले तर आभार वैशाली क्षीरसागर यांनी मानले.
चौकट.......
शिष्यवृत्तीधारक पाल्यांचा सत्कार
यावेळी गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक सभासदांचा व इयत्ता ५ वीच्या २० व ८ वीच्या १० सभासदांच्या शिष्यवृतीधारक पाल्यांचा सन्मानचिन्ह, १ हजार रुपये रोख इंग्रजी शब्दकोश व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या चर्चेत विठ्ठल माने, अमोल बाभळे, पिराजी गोरे, संतोष भोजने, बाळासाहेब गिराम, महादेव मेनकुदळे यांनी सहभाग घेतला.