मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:45+5:302021-09-27T04:35:45+5:30
उस्मानाबाद : राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांचा निषेध क्रांतिवीर लहुजी ...

मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा
उस्मानाबाद : राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांचा निषेध क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाने नोंदवून अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये सतत मातंग समाजावर अन्याय होत आहे. कंधार तालुक्यात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा पोलीस व प्रशासनाने बळाचा वापर करून काढून मातंग समाजावर लाठीचार्ज केला. महिलांना अमानुषपणे मारहाण केली. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील धनाजी साठे यांच्या अंत्ययात्रेस जातीयवादी गुंडांनी अडवून विटंबना करण्यात आली, चिंचवड येथील अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार करून आरोपी फरार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील मातंग समाजातील अनाथ व मूकबधिर मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला. अशा घटना वाढत आहेत. मात्र, शासानाकडून गुन्हेगारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढत आहे. अशा अत्याचारी जातीयवादी गावगुंडांना आळा बसावा, जलदगती स्वतंत्र न्यायालय स्थापन करून महाराष्ट्रातील मातंग समाजावरील होणारे अन्याय, अत्याचार थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर एम. आर. खिल्लारे, सुरेश खंदारे, संजय साठे, ॲड. राजू कसबे, माणिक साठे, बी. एफ. रसाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.