येरमाळा सरपंचपदी तबस्सूम सय्यद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:46+5:302021-02-10T04:32:46+5:30
येरमाळा : सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या येरमाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर तबस्सूम रफिक सय्यद, तर उपसरपंचपदी गणेश वसंतराव बारकूल ...

येरमाळा सरपंचपदी तबस्सूम सय्यद
येरमाळा : सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या येरमाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर तबस्सूम रफिक सय्यद, तर उपसरपंचपदी गणेश वसंतराव बारकूल यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. शिक्षण विस्तार अधिकारी एस. ए. फुलारी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी ए. वाय. आमले, तलाठी एस. आर. सय्यद यांनी सहकार्य केले. यावेळी भाऊसाहेब बारकूल, निशिकांत गायकवाड, विजय देशमुख, गणेश बारकूल, जाफर शेख, ग्रा. पं. लिपिक प्रीतेश बारकूल, कोतवाल संजय पवार यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातून चार महिला विजयी झाल्या होत्या. त्यामुळे चौघींनाही प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्ष सरपंचपदावर काम करण्याची संधी देण्याचा निर्णय पॅनल प्रमुख विकास बारकूल यांनी घेतला आहे.