पारगावात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:23 IST2020-06-14T10:22:28+5:302020-06-14T10:23:14+5:30

दरोडेखोरांनी गावातील वेगवेगळ्या चार घरांना लक्ष्य बनविले

A swarm of armed robbers in Pargaon; Three injured in the beating | पारगावात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत तिघे जखमी

पारगावात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत तिघे जखमी

पारगाव : वाशी तालुक्यातील  पारगाव येथे संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना सशस्त्र दरोडेखोरानी धुमाकुळ घातला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथे उपचार चालू आहेत. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीती चे वातावरण आहे.

 दरोडेखोरांनी गावातील वेगवेगळ्या चार घरांना लक्ष्य बनविले.  यात अण्णा मनोहर डोके, भुसार मालाचे व्यापारी अरुण दगडू मोटे व त्यांच्या पत्नी कालिंदा अरुण मोटे यांच्यावर  धारदार शस्त्राने वार करण्यात  आल्याने ते गंभीर जखमी झाले. अण्णा डोके यांच्यावर बीड येथील ग्रामीण रुग्णालयात तर  अरुण मोटे व त्यांची पत्नी यांच्यावर बीड येथील  खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. 

याच वेळी पारगावचे माजी सरपंच महादेव आखाडे  यांच्याही घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र येथील कुटुंब जागे असल्याने चोरटे पळून गेले.  दरम्यान मेहबूब पठाण यांच्या घरात जाऊन दरोडेखोरांनी गल्ला तोडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान शेजारच्या काही लोकांच्या घराच्या कड्या लावून हा मारहाणीचा प्रकार घडल्याने पूर्णतः गावातील नागरीक भयभीत झाले आहेत. व्यवसायिकांनी गाव बंद केले आहे.

Web Title: A swarm of armed robbers in Pargaon; Three injured in the beating