विद्यार्थ्यांनी चिंता नव्हे चिंतन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:03+5:302021-09-16T04:40:03+5:30
उमरगा : पूर्वीच्या काळात गुरुकुलमधून घेतलेल्या शिक्षणातून भारत देश हा विश्वगुरू पदाला पोहोचला होता. अर्जुनापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत अशी ...

विद्यार्थ्यांनी चिंता नव्हे चिंतन करावे
उमरगा : पूर्वीच्या काळात गुरुकुलमधून घेतलेल्या शिक्षणातून भारत देश हा विश्वगुरू पदाला पोहोचला होता. अर्जुनापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत अशी अनेक उदाहरणे आपणाला घेता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्याबाबत चिंता करीत बसण्यापेक्षा भूतकाळाची प्रेरणा घेऊन वर्तमानात चिंतन करावे. अभ्यासात सातत्य ठेवून येणाऱ्या संकटातून मार्ग काढत स्वतःचे भविष्य स्वतः घडवावे, असे प्रतिपादन लातूर रोटरी क्लबचे मेघराज बरबडे यांनी केले.
येथील शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये श्रीगणेश व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानकाळ आणि भविष्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य विजयकुमार पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र शिंदे, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग आदी उपस्थित होते. या विचारमंचावर बाबूराव स्वामी, नितीन होळे, प्रवीण स्वामी, संतराम मुर्जानी, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले. आभार मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी मानले.