कर्मचारी संपावर, रजिस्ट्रीचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:48+5:302021-09-22T04:36:48+5:30
कळंब : विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने ...

कर्मचारी संपावर, रजिस्ट्रीचे काम ठप्प
कळंब : विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने मंगळवारी कामकाज ठप्प झाले. शिवाय याचा काहीही संबंध नसताना मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांक तुटवडा केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नती, पदनामात बदल, कोरोनाकाळातील मयत कर्मचारी यांना मदत, संगणकीयप्रणालीमधील त्रुटी दूर करणे अशा विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत कामबंद ठेवले आहे. यामुळे मंगळवारी दिवसभर कळंबच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट होता. परिणामी नोंदणी व अन्य कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. यासंदर्भात दुय्यम निबंधक श्रीसपवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
चौकट...
संप कर्मचाऱ्यांचा अन् तुटवडा मुद्रांकाचा....
दरम्यान, सध्या सौर पंपासाठी ऑनलाइन प्रस्ताव दाखल करणे चालू झाले आहे. यासाठी नव्या जलस्रोतांची सातबारावर नोंद असणे गरजेचे आहे, अशी नोंद लावण्यासाठी तलाठी स्टॅम्प पेपर मागत आहेत. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मंगळवारी कळंब गाठले. मात्र, अनेकांना शहरातील एकाही स्टॅम्प विक्रेत्याकडे स्टॅम्प मिळाला नाही. यासंबंधी जिल्हा निबंधक माईनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंबंधी चौकशी करतो असे सांगितले.
210921\20210921_140159.jpg
कळंब फोटो