शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परंड्यात शेतकऱ्यांनी अल्प दर मिळाल्याने रस्त्यावर फेकला कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:04 IST

परंडा (उस्मानाबाद ) : कांद्याला २५ रुपये क्विंटल अर्थात २५ पैसे किलो भाव मिळत आहे़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी ...

परंडा (उस्मानाबाद ) : कांद्याला २५ रुपये क्विंटल अर्थात २५ पैसे किलो भाव मिळत आहे़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यावर कांदा फेकून ठिय्या आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती़

कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली़ मात्र कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शनिवारी परंडा येथे आंदोलन केले़ शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यावर कांदा फेकून दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली.

आंदोलनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर घोगरे, तालुका युवाध्यक्ष शिवाजी ठवरे, शहराध्यक्ष सादात काझी, सुरेश डाकवाले, फारूक शेख, आरीफ शेख, रामेश्वर सोनमाळी, दादासाहेब पाडूळे, उत्रेश्वर गुडे, प्रविण डाकवाले, राजू पाटील, उत्रेश्वर ठवरे, रामहरी हागवणे, वसुदेव बोबडे, नंदू कुंभार, धर्मा जगदाळे, विकास बोबडे याच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही़ त्यामुळे कांदा निर्यातीस चालना द्यावी, कमीत कमी २ हजार रुपये भाव द्यावा, दुष्काळामुळे रबी पिके, फळबागा पाण्या अभावी जळून गेल्या आहेत़ याचे पंचनामे तात्काळ करून अनुदान द्यावे यासह इतर मागण्या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ आंदोलनादरम्यान पोउपनि संतोष जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीTahasildarतहसीलदारonionकांदा