टँकरचालकांच्या हातामध्ये स्टेरिंग, तर सफाई मजुराला केले फायरमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:36 AM2021-03-01T04:36:41+5:302021-03-01T04:36:41+5:30

टँकरचालकांच्या हातामध्ये स्टेरिंग, तर सफाई मजुराला केले फायरमन उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील अग्निशमन दल तितकेसे सक्षम ...

The steering wheel in the hands of the tanker driver, while the cleaning worker did the fireman | टँकरचालकांच्या हातामध्ये स्टेरिंग, तर सफाई मजुराला केले फायरमन

टँकरचालकांच्या हातामध्ये स्टेरिंग, तर सफाई मजुराला केले फायरमन

googlenewsNext

टँकरचालकांच्या हातामध्ये स्टेरिंग, तर सफाई मजुराला केले फायरमन

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील अग्निशमन दल तितकेसे सक्षम नाही. अप्रशिक्षित कर्मचारी व अपुऱ्या मनुष्यबळामुळे या विभागाची भिस्त नगर परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर आहे. सध्या अग्निशमन विभागातील वाहनांचे स्टेरिंग पाणीपुरवठा व बांधकाम विभागातील टँकर चालकांच्या हाती आहे, तर फायरमन म्हणून स्वच्छता कर्मचारी काम करीत आहेत. उस्मानाबाद येथील अग्निशमन दलात पाच मंजूर पदे आहेत. यात श्रेणी अ मधील एक पद, श्रेणी ब व श्रेणी क मधील तीन पदांचा समावेश आहे. यातील केवळ क वर्गातील एक पद भरलेले आहे. उर्वरित चार पदे रिक्त आहेत. त्यामुळे नगर परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील शिपाई, लिपिक वाहनचालक, आदी कर्मचाऱ्यांना अग्निशमन विभागात तात्पुरत्या नियुक्त्या दिल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलातील एक कर्मचारी, तर नगर परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील १२ अशा एकूण १३ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विभागाचा गाडा हाकला जात आहे. पालिकेतील कर्मचाऱ्यांचे वय ४५ पेक्षा अधिक असल्यामुळे त्यांना प्रशिक्षण मिळत नाही. परिणामी, पाणीपुरवठा विभागाच्या टँकरवर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अग्निशमनचे वाहन चालवावे लागत आहे, तर स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना फायरमनची ड्युटी बजावावी लागत आहेत.

१२ अप्रशिक्षित कर्मचारी

गतवर्षीचा निधी मिळाला

अग्निशमन विभागाकडून साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी डीपीडीसीकडे केली जात असते.

२०१९-२० या वर्षात साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी केली असता, या वर्षी निधी मंजूर झाला आहे.

मंजूर निधीतून कर्मचाऱ्यांना गम बूट, हेल्मेट, गणवेश, सिडी, पाईप, रेनकोट, टी-शर्ट खरेदी केले आहे.

यावर्षी निधीची मागणी केली नसून, त्यांचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे अग्निशमन विभागातून सांगण्यात आले.

अग्निशमन विभागातील मंजूर व रिक्त पदे

पद मंजूर पद रिक्त

अग्निशमन अधिकारी १ १

स्थानक अधिकारी १ १

सहायक स्थानक अधिकारी ३ २

उस्मानाबादमधील १२ कर्मचारी अप्रशिक्षित

उस्मानाबाद अग्निशमन विभागात शहराच्या लोकसंख्येनुसार ५ पदे मंजूर आहेत. यात श्रेणी अ मधील १, श्रेणी ब मध्ये १ व श्रेणी क मध्ये ३ पदांचा समावेश आहे. मात्र, सध्या यापैकी श्रेणी क मधील केवळ १ पद भरलेले आहे. या कर्मचाऱ्यास प्रशिक्षण मिळालेले आहे.

अग्निशमन विभागातील रिक्त पदांमुळे नगर परिषदेच्या इतर विभागांतील १२ कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या दिलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचे वय अधिक असल्यामुळे त्यांना प्रशिक्षणही मिळालेले नाही. मागील ८ ते १० वर्षांतील सेवेच्या अनुभवावरच हे कर्मचारी अग्निशमन विभागाचा गाडा हाकत आहेत.

कोट...

आमच्याकडे एकूण पाच पदे मंजूर आहेत. यातील केवळ एक पद श्रेणी क वर्गातील भरलेले आहे. उर्वरित चार पदे रिक्त आहेत. नगर परिषदेचे १२ कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. कर्मचाऱ्यांचे वय अधिक असल्यामुळे त्यांना प्रशिक्षण मिळालेले नाही. यातील ३ वाहन चालक, ३ टेलिफोन ऑपरेटर व सहाजण फायरमनचे काम करीत आहेत.

हेमंत कार्ले,

प्रमुख अग्निशमन विभाग, न. प. उस्मानाबाद

Web Title: The steering wheel in the hands of the tanker driver, while the cleaning worker did the fireman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.