आर्थिक मदतीसाठी प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:33 AM2021-04-22T04:33:35+5:302021-04-22T04:33:35+5:30

‘काेरोनामुक्त गाव’साठी गोविंदपूर येथे बैठक खामसवाडी : कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे ‘माझे गाव, काेरोनामुक्त गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद ...

Statement to the administration for financial assistance | आर्थिक मदतीसाठी प्रशासनाला निवेदन

आर्थिक मदतीसाठी प्रशासनाला निवेदन

googlenewsNext

‘काेरोनामुक्त गाव’साठी गोविंदपूर येथे बैठक

खामसवाडी : कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे ‘माझे गाव, काेरोनामुक्त गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद सदस्य सोनाली वैभव मुंडे व सरपंच सुनीता उमाकांत मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी कुटुंबांना भेटी देणे, मास्क वापरणे, कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांना दवाखान्यात जाण्यासाठी प्रवृत्त करणे, लस घेण्याबाबत जनजागृती आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वैभव मुंडे, सरपंच सुनीता मुंडे, ग्रामसेवक पंकज भानवसे, ॲड. भाग्यश्री मुंडे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक कनकवाड, आरोग्य सेविका खंदारे, अक्षय मुंडे, रघुनाथ मुंडे, विष्णू मुंडे, अविनाश सावंत, संतोष मुंडे, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, सर्व शिक्ष, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे यश

उस्मानाबाद : ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ऑनलाईन एएफआय प्री लेव्हल १ कोचिंग परीक्षेत उस्मानाबाद जिल्हा संघटनेच्या प्रशिक्षकांनी यश संपादन केले. परीक्षेचा निकाल ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमरीवला व चेअरमन डॉ. ललित भानोत यांनी नुकताच जाहीर केला. या परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील योगेश थोरबोले, अजिंक्य वराळे, ज्ञानेश्वर भुतेकर, राम भुतेकर आदी प्रशिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी प्रशिक्षकांनी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष संजय बदोले यांनी मार्गदर्शन केले.

कोरोना केंद्राला खासदारांची भेट

तुळजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर आणि तुळजाभवानी देवस्थान समितीच्या १२४ खोल्यांच्या रुग्णालयास खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रशासनास आवश्यक सूचना केल्या. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, मुख्याधिकारी अशिष लोकरे, लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे, सचिन अमृतराव, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुहास पवार, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंचल बोडके, डॉ. श्रीधर जाधव आदी उपस्थित होते.

जनजागृती अभियान

कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील मौजे कोंबडवाडी येथे मंगळवारी शिक्षकांनी गावातील व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. पीठाची चक्की, दूध डेअरी, खवा भट्टी चालक आदींना या नोटिसा देण्यात आल्या.

एसटी बंद

तुळजापूर : राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले असून, या पार्श्वभूमीवर प्रवाशी संख्या देखील घटली आहे. त्यामुळे येथील एसटी आगारातील जवळपास ८० टक्के बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

एकास मारहाण

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील वाठवडा येथील मुनीर दिल्लू सय्यद हे १८ एप्रिल रोजी त्यांच्या शेतात होते. यावेळी समीर सलिम बेग यांनी त्यांना शिवीगाळ करून कुऱ्हाडीने मारहाण केली. याप्रकरणी शिराढोण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Statement to the administration for financial assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.