पुतळा सुशोभीकरण कामास सुरुवात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:52+5:302021-03-20T04:31:52+5:30
तुळजापूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्ताने पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्पचित्र प्रसिद्ध करून, पूर्णाकृती पुतळा व सुशोभीकरण ...

पुतळा सुशोभीकरण कामास सुरुवात करा
तुळजापूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्ताने पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्पचित्र प्रसिद्ध करून, पूर्णाकृती पुतळा व सुशोभीकरण कामास १४ एप्रिल रोजी सुरुवात करावी, अशी मागणी तुळजापूर येथील भीम युवकांच्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तुळजापूर शहरामध्ये उभा राहावा, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असून, यानुसार पुतळा मंजूर होऊनही आजतागायत काम सुरू झाले नाही.
सध्या पूर्णाकृती पुतळा तयार झाला असून, शिल्पकारास पुतळा निधी सुपूर्द करून येऊन १४ एप्रिलपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या संकल्पचित्राचे अनावरण करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावर सागर कदम, लक्ष्मण कदम, कुणाल रोंगे, संजय कदम, सुरज दांडे, आदित्य कदम, आकाश जाधव, विशाल कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.