पानगाव येथे शौर्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:32 IST2021-01-03T04:32:22+5:302021-01-03T04:32:22+5:30

सध्याच्या कोरोना संकटामुळे प्रशासनाने यावर्षी भीमा कोरेगाव येथे मानवंदनेस येणाऱ्या अनुयायांना खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली होती. त्यामुळे ...

In the spirit of Shaurya Din at Pangaon | पानगाव येथे शौर्य दिन उत्साहात

पानगाव येथे शौर्य दिन उत्साहात

सध्याच्या कोरोना संकटामुळे प्रशासनाने यावर्षी भीमा कोरेगाव येथे मानवंदनेस येणाऱ्या अनुयायांना खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली होती. त्यामुळे पानगाव येथे गावातील युवक अजय ओव्हाळ, माणिक ओव्हाळ, किरण ओव्हाळ, किशोर ओव्हाळ, अनिल सावंत, बारीकराव ओव्हाळ, विजय ओव्हाळ, प्रशांत भालेराव यांच्या पुढाकाराने भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाची प्रतीकात्मक उभारणी करण्यात आली. यानंतर १ जानेवारी रोजी भीमनगरमध्ये मानवंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी सरपंच विजय चव्हाण, लक्ष्मण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माजी सैनिक देवीदास ओव्हाळ, वसंतराव ओव्हाळ, बळीराम ओव्हाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.

लक्ष्मण शिंदे, शिवाजी कांबळे यांनी यावेळी भीमा कोरेगाव विजयी स्तंभाच्या शौर्यगाथेचा इतिहास मांडला.

Web Title: In the spirit of Shaurya Din at Pangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.