कसबे तडवळे परिसरात सोयाबीन पीक पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:37+5:302021-09-27T04:35:37+5:30

कसबे तडवळे परिसरातील ३ हजार ८०० हेक्टरपैकी २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर यंदा सोयाबीनचा पेरा झाला. पाऊस वेळेवर झाल्याने ...

Soybean crop in water in Kasbe Tadwale area | कसबे तडवळे परिसरात सोयाबीन पीक पाण्यात

कसबे तडवळे परिसरात सोयाबीन पीक पाण्यात

कसबे तडवळे परिसरातील ३ हजार ८०० हेक्टरपैकी २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर यंदा सोयाबीनचा पेरा झाला. पाऊस वेळेवर झाल्याने पेरणीही वेळेवरच झाली. पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार पाऊस होत गेला. मध्यंतरी पंधरा दिवस पावसाने ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांना फटका बसला. मात्र, सुपीक जमिनीवरील पिके जोमात होती. या महिन्यात मात्र गरजेपेक्षा जास्त पाऊस होत गेल्याने चांगल्या पिकाचे नुकसान होत गेले. मोठा पाऊस झाल्याने सर्व नदी-नाले तुडुंब भरल्यानंतर शेतातील पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. आता हा पाऊस कधी थांबणार आणि पिकातील पाणी कधी निघणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

कसबे तडवळेसह, खामगाव, खेड, दुधगाव, जवळा(दू), गोपाळवाडी, कोंबडवाडी, रुई, तूगाव, परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन सध्या पाण्यात आहे. मागील चार-पाच दिवसांपासून पाऊस असल्याने आता सोयाबीनला जागीच कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे कृषी विभाग व संबंधित विमा कंपनी यांनी तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रतिक्रिया-

मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाच्या भागात पाणी साचून नुकसान झाले आहे. या शेताची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानीच्या सूचना कशा द्याव्यात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ॲपद्वारे सूचना दिलेल्या आहेत. नुकसान झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी ॲपद्वारे तक्रारी नोंदवाव्यात.

- राम शिंदे, कृषी सहायक, कसबे तडवळे

यंदा नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा केला होता. सुरुवातीस निसर्गानेही चांगली साथ दिली. त्यामुळे शेतामध्ये उत्पन्नाच्या आशेने मोठ्या प्रमाणात मशागतीसाठी खर्च केला होता. परंतु, आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन पावसाने हिरावून घेतल्याने सर्व खर्च व मेहनत पाण्यात गेली आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. प्रशासनाने तत्काळ सरसकट नुकसानभरपाई द्यावी.

- याकूब फकीर, शेतकरी

250921\50111827-img-20210925-wa0031.jpg

कसबे तडवळे येथील शेतकऱ्याची सोयाबीन पीक पाण्यात

Web Title: Soybean crop in water in Kasbe Tadwale area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.