विद्युत खांब उभारणीचे भिजत घाेंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:36+5:302021-03-06T04:30:36+5:30
प्रभाग क्र. १६ लोहारा : शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये सिमेंट रस्ते व ५० टक्के नाल्यांची कामे झाली ...

विद्युत खांब उभारणीचे भिजत घाेंगडे
प्रभाग क्र. १६
लोहारा : शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये सिमेंट रस्ते व ५० टक्के नाल्यांची कामे झाली आहेत. परंतु, दुसरीकडे अनेक भागात विद्युत लाईनची सुविधा नाही. हा प्रश्न पाच वर्षांपूर्वीही हाेता. निवडणूक काळात सर्वांनीच आश्वासने दिली हाेती. परंतु, आजवर या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त हाेत आहे.
लोहारा शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये ईदगाह मज्जिदचा भाग येतो. उत्तरेस एसबीआय बॅंक ते सांस्कृतिक सभागृहाची पश्चिम बाजू ,पूर्वेस सांस्कृतिक सभागृह, फुटाणकर घर , संजय माटे घर ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ,दक्षिणेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ते कमलाकर माटे घर, पश्चिमेस कमलाकर माटे घर ते एसबीआय बॅंक अशी या प्रभागाची रचना आहे. हा प्रभाग मुळातच १९८६ नंतर वसलेला आहे. पण १९९३ च्या प्रलंकारी भूकंपानंतर येथील घराच्या संख्येत वाढ झाली. ग्रामपंचायत असताना काही प्रमाणात मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या असल्या तरी त्या अपुऱ्याच होत्या. पण ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाला आणि विकास कामे होतील अशी अशा नागरिकांत होती. पण सुरूवातीचे अडीच वर्षे प्रभागात काहीच विकास कामे झाली नाहीत. पण नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात या प्रभागात कामे झाली. यात नवाज सय्यद घर ते अमर माटे सिमेंट रस्ता, हासिना कुरेशी घर ते शब्बीर शेख घर सिमेंट रस्ता,नाजिम कुरेशी घर ते पाशु खुट्टेपड घर सिमेंट रस्ता,शब्बीर शेख घर ते सुनीता कांबळे घर सिमेंट रस्ता, जब्बार बागवान घर ते खुट्टेपड घर सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूने नाली, किसन माटे घर ते हासन आली घर सिमेंट रस्ता व एका बाजूने नाली, उत्तम गोरे घर ते मैनुद्दीन शेख घर सिमेंट रस्ता, महेमुद शेख दुकान,इदगा मज्जिद ते महमंद हुसेन बागवान सिमेंट रस्ता, हमजा खुट्टेपड घर ते संतोष पवार घर सिमेंट रस्ता, एसबीआय बॅंक ते रसुल खुट्टेपड घर सिमेंट रस्ता,सांस्कृतिक सभागृह ते रुबाब शेख घर सिमेंट रस्ता, महमद हुसेन बागवान घर ते बाबुलाल मोमिन घरापर्यंत एका बाजूने नाली, महेबूब कुरेशी घर ते महेमूद शेख दुकान एका बाजूने नाली याच बरोबर आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निधीतून एक बोअर घेण्यात आली आहे. या प्रभागातील नळाला खारे पाण्याचा पुरवठा होत होता.तो बंद करुन गोड पाणीपुरवठा केल्याचे नगरसेवक आरीफ खानापुरे यांनी सांगितले आहे. पण या प्रभागात सिमेंट रस्त्याचे कामे झाली असली तर नाल्याची कामे पन्नास टक्के झाल्याचे सांगितले जात आहे. पण अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या बाजूने असलेले काही नाल्यातून सांडपाण्याचा निसरा होत नसल्याचे नागरिक सांगत असून यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत आहेत. त्यात इतर गल्लीमध्ये नाल्याचे कामे झाली नाहीत. त्यामुळे सांडपाणी व पावसाळ्यात पावसाचे पाणी जाण्यास अडचण निर्माण होणार असल्याने प्रामुख्याने नाल्याची ही कामे होणे गरजेचे आहेत. त्यात या प्रभागातील प्रमुख प्रश्न आहे. तो विजेच्या पोलचा काही गल्लीत वीज पोल उभारले गेले आहेत. पण त्या पोलवर तारा ओढल्या गेल्या नाहीत. तर काही गल्लीमध्ये काहीच नाही. त्यामुळे बहुतांश घरांना वीज कनेक्शन हे लांब असलेल्या चार ते पाच विजेच्या पोलवरुन घेतले गेले आहे. ज्यात गल्ली विजेची पोल आहेत. त्यांच्या तारा झोळ पडलेल्या असून काहींच्या घरावरून चक्क हात लागू शकतो अशी परिस्थिती आहे. काही महिन्यापूर्वी पोलला वाहनाची धडक लागल्याने विजेची तार घरावर पडल्याची घटना घडली आहे. यामुळे या प्रभागातील विजेचा प्रश्न प्राधान्यक्रमाने प्रशासनाने सोडविणे गरजेचे आहे.
काेट...
प्रभागात झालेल्या कामाचा दर्जा नाही. गटारीतून सांडपाण्याचा निसरा होत नाही. त्यात गटारी झाल्या नाहीत तेथील सांडपाण्याचा प्रश्न आहे. गेले दोन महिन्यापूर्वी माझ्या घरी डेग्यूचे तीन रुग्ण होते. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.वीज पोल उभारणे गरजेचे आहे.
- निहाल मुजावर, नागरिक.
प्रभाग क्रमांक १६ मधील सिमेंट रस्ते झाले. पण कामाचा दर्जा नाही. राहिलेल्या नाल्याची कामे होणे गरजेचे आहेत. आमदार निधीतून बोअर पाडले गेले आहे. तर खासदार निधीतून सिमेंट रस्ते झाली आहेत. नगरपंचायतचे काम काहीही नाही.
-हामजा खुट्टेपड, नागरिक.
प्रभागात सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले. नाल्याचे काम पन्नास टक्के झाले. पाण्याचा प्रश्न ही मिटला असून वीज पोल संदर्भात २० पोलला मंजूर मिळाली असून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. त्याचे काम लवकर सुरु करण्यात येईल.
-आरीफ खानापुरे, नगरसेवक.
फोटो ओळी... लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विजेचे खांब गेले अनेक वर्षापासून असेच उभे आहे.
फोटो ओळी - लोहारा शहरातील प्रभाग १६ मध्ये दूरच्या खांबावरून असे वीज कनेक्शन घ्यावे लागते.