साहेबत, ‘गटा’चा नेता म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST2021-09-19T04:33:41+5:302021-09-19T04:33:41+5:30

देशात आणि राज्यातही ‘हाती’ स्वबळाचा नारा देण्याइतपत संख्याबळ न उरलेल्या पक्षाची सदस्य संख्या जिल्हा परिषदेत दखलपात्र आहे. याच पक्षांतील ...

Sir, as the leader of the 'group' ... | साहेबत, ‘गटा’चा नेता म्हणून...

साहेबत, ‘गटा’चा नेता म्हणून...

देशात आणि राज्यातही ‘हाती’ स्वबळाचा नारा देण्याइतपत संख्याबळ न उरलेल्या पक्षाची सदस्य संख्या जिल्हा परिषदेत दखलपात्र आहे. याच पक्षांतील सदस्यांचे गटाचे प्रमुख विषय समितीच्या बैठकीत माेठ्या तावातावाने दाखल हाेतात. अन् संबंधित विभाग प्रमुखांवर अक्षरशा तुटून पडतात. त्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करतात. बैठकीनंतर अनेक सदस्य ‘नेते, आपण बराेबर बाेललात’, असे म्हणताच ‘गटा’च्या नेत्याची छाती फुगते. तेवढ्यात आराेप झाललेले अधिकारी बैठकीच्या दालनातून बाहेर पडतात. अन् ‘गटा’चा नेतेही त्यांच्या मागाेमाग जातात. खुर्चीत विराजमान हाेतात की नाही ताेच, ‘‘साहेब तेवढे आमच्या कामाचं काय झालं’’, अशी विचारणा करतात. त्यांच्या या प्रश्नाने संतप्त झालेले विभाग प्रमुख ‘‘हे आपलं बरं आहे, सभागृहात आमचे कपडे फाडायचे. अन् कार्यालयात येऊन कामाचे विचारायचे’’, अशा शब्दात त्रागा केला. ‘‘आपल्या कामाचं काही खरं नाही असे लक्ष्यात येताच, ‘‘साहेब, मी आमच्या पक्षातील सदस्यांच्या ‘गटा’चा नेता आहे. त्यामुळे असं बाेलावं लागतं. काय करणार?’’ असे म्हणून त्यांनी आपली कामाची मंजुरी विभाग प्रमुखांच्या गळी उतरविली.

Web Title: Sir, as the leader of the 'group' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.