नीळकंठेश्वर मंदिरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST2021-04-14T04:30:15+5:302021-04-14T04:30:15+5:30

कोरोना प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वराची यात्रा यावर्षीही कोरोनामुळे रद्द ...

Shukshukat in Neelkantheshwar temple | नीळकंठेश्वर मंदिरात शुकशुकाट

नीळकंठेश्वर मंदिरात शुकशुकाट

कोरोना प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वराची यात्रा यावर्षीही कोरोनामुळे रद्द करण्यात आली. शिवाय, मंदिरदेखील बंद करण्यात आल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या मंदिरात शुकशुकाट दिसून आला.

येथे प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला ग्राम दैवत श्री नीळकंठेश्वराची मोठी यात्रा भरते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. परिसरात या मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती असल्याने या यात्रेला परिसरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. गुढीपाडव्याच्या दिवशी मानाची कावड गावातून वाजत-गाजत मोठ्या उत्साहात ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वर मंदिरात येते. दुसऱ्या दिवशी २०० ते ३०० भविकांसह शिखर शिंगणापूरला जात असत; मात्र यावर्षीही वाढत्या कोरोनामुळे यात्रा उत्सव बंद करण्यात आले असून, मंगळवारी मोजक्याच मानकऱ्यांसह श्री नीळकंठेश्वरास सकाळी अभिषेक करण्यात आला, तसेच मानाची महादेवाची कावड मंदिरात आणण्यात आली. दरवर्षी गुढी पाडव्याला भाविकांनी गजबजून जाणाऱ्या मंदिरात यंदा मात्र शुकशुकाट दिसून आला.

चौकट....

कावड मंदिरातच

कोरोनामुळे यंदा सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील कावड शिखरशिंगणापूरला जाणार नसून, ती मंदिरातच राहणार असल्याची माहिती कावडीचे मुख्य काटकर संभाजी बिराजदार, शाहुराज बिराजदार, संदीप बिराजदार यांनी सांगितले.

Web Title: Shukshukat in Neelkantheshwar temple