पाेळ्याच्या पूर्वसंध्येला दुकान फाेडले, तेलाचे डबे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST2021-09-07T04:39:41+5:302021-09-07T04:39:41+5:30

वाशी शहरातील जुन्या बस स्थानकालगत कोरे यांचे शाॅपिंग काॅम्प्लेक्स आहे. यामध्ये प्रभूलिंग बसलिंग भाळवणे यांचे किराणा दुकान आहे. ...

The shop was ransacked on the eve of the festival, cans of oil were lit. | पाेळ्याच्या पूर्वसंध्येला दुकान फाेडले, तेलाचे डबे लंपास

पाेळ्याच्या पूर्वसंध्येला दुकान फाेडले, तेलाचे डबे लंपास

वाशी शहरातील जुन्या बस स्थानकालगत कोरे यांचे शाॅपिंग काॅम्प्लेक्स आहे. यामध्ये प्रभूलिंग बसलिंग भाळवणे यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ५ सप्टेंबरच्या रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शेडच्या मागील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. यानंतर, आतील खाद्य तेलाचे डबे व अन्य साहित्य मिळून ३० हजारांचा किरणा लंपास केला. साेमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर चाेरीची ही घटना समाेर आली. या प्रकरणी भाेळवणे यांनी वाशी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाशी शहर व परिसरात चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: The shop was ransacked on the eve of the festival, cans of oil were lit.