धक्कादायक ! उस्मानाबादेत कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; जिल्ह्यातील ८ वा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:32 IST2020-06-23T10:30:47+5:302020-06-23T10:32:18+5:30

परंडा ठाण्यात कार्यरत असलेले 55 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Shocking! Corona kills policeman in Osmanabad; 8th death in the district | धक्कादायक ! उस्मानाबादेत कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; जिल्ह्यातील ८ वा बळी

धक्कादायक ! उस्मानाबादेत कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; जिल्ह्यातील ८ वा बळी

परंडा (जि. उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हवालदाराचा मंगळवारी पहाटे कोरोनाने बळी घेतला आहे. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 8 वर पोहोचली आहे.

परंडा ठाण्यात कार्यरत असलेले 55 वर्षीय हवालदार हे किडनी व लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. जून महिन्यातच त्यांनी सोलापूर येथे उपचार घेतले होते. त्यांच्यासमवेत रुग्णालयात गेलेल्या पत्नी व मुलास त्रास होत असल्याने त्यांची तपासणी केली असता 12 जून रोजी ते कोरोनाबाधित आढळून आले. यानंतर 14 रोजी हवालदार व त्यांचा आणखी एक मुलगाही बाधित आढळला. दरम्यान, बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा उपचार सुरू असताना 22 जून रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या मृत्यूने जिल्ह्यातील पहिला पोलिस बळी गेला आहे.

Web Title: Shocking! Corona kills policeman in Osmanabad; 8th death in the district