शिवशाही बस धावू लागल्या, प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:42+5:302021-09-06T04:36:42+5:30

उस्मानाबाद : कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा जून महिन्यापासून सुरू झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर आता शिवशाही ...

Shivshahi buses started running, mixed response from passengers | शिवशाही बस धावू लागल्या, प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद

शिवशाही बस धावू लागल्या, प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद

उस्मानाबाद : कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा जून महिन्यापासून सुरू झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर आता शिवशाही बसही धावू लागल्या आहेत. मुंबई, पुणे या मार्गावर त्या धावत असून, या बसला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत.

उस्मानाबाद विभागाच्या उस्मानाबाद आगारात ६, तुळजापूर ४ व उमरगा आगारात ४ बस आहेत. कोरोना काळात या बस बंद होत्या. निमआराम, साध्या बसगाड्या सुरू झाल्या तरी या बस बंदच होत्या. प्रवाशांकडून बस सुरू करण्याची मागणी होऊ लागल्याने महामंडळाने या बस सुरू केल्या आहेत. मुंबई, पुणे मार्गावर बस धावत आहेत. सध्या बसला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्यामुळे प्रवाशांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

उस्मानाबाद - मुंबई

उस्मानाबाद - बोरीवली

उस्मानाबाद - पुणे

उमरगा - पुणे

तुळजापूर - पुणे

बसचे दररोज सॅनिटायझेशन

उस्मानाबाद आगाराच्या ४ बस पुणे, २ मुंबई, २ बोरीवली मार्गावर धावत आहेत. कोरोनाचा संसर्ग टळलेला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसचे दररोज सॅनिटायझेशन केले जात आहे. शिवाय, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

कोट...

उस्मानाबाद स्थानकातून बोरीवली, मंबई, पुणे या मार्गावर शिवशाही बस सोडण्यात येत आहेत. मात्र, या बसला अद्याप संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दररोज प्रत्येक शिवशाही बसमधून सरासरी ३५ ते ३६ प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी बस सॅनिटाइज केल्या जात आहेत.

-पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद

Web Title: Shivshahi buses started running, mixed response from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.