शिवशाही बसेस धावू लागल्या, प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:34+5:302021-09-05T04:36:34+5:30
उस्मानाबाद : कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा जून महिन्यापासून सुरू झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर आता शिवशाही ...

शिवशाही बसेस धावू लागल्या, प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद
उस्मानाबाद : कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा जून महिन्यापासून सुरू झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर आता शिवशाही बसेसही धावू लागल्या आहेत. मुंबई, पुणे या मार्गावर त्या धावत असून, या बसेसला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद विभागाच्या उस्मानाबाद आगारात ६, तुळजापूर ४ व उमरगा आगारात ४ बसेस आहेत. कोरोना काळात या बसेस बंद होत्या. निमआराम, साध्या बसगाड्या सुरू झाल्या तरी या बसेस बंदच होत्या. प्रवाशांकडून बसेस सुरू करण्याची मागणी होऊ लागल्याने महामंडळाने या बसेस सुरू केल्या आहेत. मुंबई, पुणे मार्गावर बसेस धावत आहेत. सध्या बसेसला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्यामुळे प्रवाशांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
उस्मानाबाद - मुंबई
उस्मानाबाद - बोरीवली
उस्मानाबाद - पुणे
उमरगा - पुणे
तुळजापूर - पुणे
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
उस्मानाबाद आगाराच्या ४ बसेस पुणे, २ मुंबई, २ बोरीवली मार्गावर धावत आहेत. कोरोनाचा संसर्ग टळलेला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसेसचे दररोज सॅनिटायझेशन केले जात आहे. शिवाय, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
कोट...
उस्मानाबाद स्थानकातून बोरीवली, मंबई, पुणे या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, या बसेसला अद्याप संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दररोज प्रत्येक शिवशाही बसमधून सरासरी ३५ ते ३६ प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी बस सॅनिटाईझ केल्या जात आहेत.
पांडुरंग पाटील, आगार प्रमुख, उस्मानाबाद