शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:06 IST

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

उस्मानाबाद/मुंबई - शिवसेनेच्या गटात मोठी बंडखोरी झाल्यानंतर 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी शिंदे गटासोबत राहणं पसंत केलं. त्यामुळे, भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, शिवसेनेच्या 2 आमदारांनी शिंदे गटातून पळ काढत घरवापसी केली. त्यापैक एक होते उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील. आता, याच कैलास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 6 जुलै रोजी पत्र पाठवून त्यांच्या एकनिष्ठेचं कौतुक केलं आहे. 

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पत्र आज प्राप्त झाले आणि एका अर्थाने कृतार्थ झालो. राजकारणात तत्व, निष्ठा ही मूल्ये पाळायचे बाळकडू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांना पाजले आहे. सच्चा शिवसैनिक ही मूल्ये आजही प्रामाणिकपणे, तळमळीने पाळतो, हे मागच्या काही दिवसांत संपूर्ण देशाने पाहिले आहे'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या पत्राबद्दल आमदारा कैलास पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

राजकारणात सत्ता येते जाते, पदे मिळतात आणि जातातही. पण, सच्च्या शिवसैनिकांच्या तत्वात काडीचाही अंतर कधी येत नसते. ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन संघर्षाला उतरलेल्या मावळ्यांना सत्ता-पदाची नक्कीच फिकीर नाही. शिवसेना आणि शिवसैनिक येणाऱ्या आव्हानांना निधड्या छातीने समोर जातात, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे.  कित्येक आले आणि गेलेही, पण शिवसेना मजबुतपणे उभी आहे, ती कट्टर शिवसैनिक मावळ्यांच्या जीवावर. उद्धव ठाकरेंनी माझ्यासारख्या शिवसैनिकावर दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवून दाखविणे, हेच आता ध्येय आहे. संघर्षाची वीण घट्ट गुंफून, चला पुन्हा उठुया पेटून... चला पुन्हा लढूया पेटून... असे म्हणत कैलास पाटील यांनी पक्षप्रमुखांच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.  

कैलास पाटील यांचा थरारक अनुभव

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे संकट उभं राहिलं होतं, जे पुढे सत्तांतरात बदललं. शिंदेगटाने आमदारांचे अपहरण करून त्यांना सूरतला नेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप झाला. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांसमोर थरारक अनुभव सांगितला होता. सोमवारी विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नव्हती. काही तासाचा प्रवास झाल्यानंतर चलबिचल सुरु झाल्याने पुढे शिंदे साहेब थांबले आहेत, त्यांना भेटू, असे सांगून वाहने तशीच पुढे नेण्यात आली. ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेKailas Patilकैलास पाटीलMLAआमदार