शिवसेना, युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST2021-08-25T04:37:55+5:302021-08-25T04:37:55+5:30

उमरगा : केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले असून ...

Shiv Sena, Yuva Sena's Jode Maro Andolan | शिवसेना, युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन

शिवसेना, युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन

उमरगा : केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले असून उमरगा तालुका शिवसेना, युवा सेनेकडून मंगळवारी नारायण राणे यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

कोरोनासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील परिस्थिती कुशलतेने हाताळली. याची दखल घेऊन भारतातील अनेक सेवाभावी संस्था, माध्यमांनी त्यांचे काैतुकही केले. याच पोटशूळ उठून नारायण राणे अपशब्द वापरत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. यावेळी तालुका युवा सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, युवासेना विधानसभा संघटक शरद पवार, माजी तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, सचिन जाधव, तालुकाप्रमुख अजित चौधरी, शिवसेना शहरप्रमुख जिडा सुरवसे, युवा सेना शहरप्रमुख अमर शिंदे, बलभीम येवते, प्रशांत पोचापुरे, खयुम चाकूरे, उद्धव बिराजदार, काका गायकवाड, महादू क्षीरसागर, विजय कदम, प्रदीप शिवनेचारी, सागर उमशेट्टे, लिंगराज स्वामी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Sena, Yuva Sena's Jode Maro Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.