लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून, खावी लागू शकते जेलची हवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:26+5:302021-09-14T04:38:26+5:30
उस्मानाबाद : प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढला आहे. कधी-कधी एखादी संस्था, नागरिक यांची बदनामी ...

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून, खावी लागू शकते जेलची हवा !
उस्मानाबाद : प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढला आहे. कधी-कधी एखादी संस्था, नागरिक यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमांवर मजकूर तयार करून टाकला जातो. टाकण्यात आलेला मजकूर खरा की खाेटा, हे तपासण्याची काेणतीही यंत्रणा नाही. या मजकुराची काेणतीही शहानिशा न करता ताे काही नागरिकांकडून फाॅरवर्ड केला जातो. या मजकुराच्या माध्यमातून ज्याची बदनामी झाली आहे. अशा व्यक्ती याबाबत पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करते. सायबर विभागामार्फत याची तपासणी करून मजकूर निर्माण करणाऱ्याचा, तसेच ताे शेअर करणाऱ्याचा शाेध घेतला जातो. त्यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात येतो. वेळप्रसंगी अशा व्यक्तींना जेलची हवाही खावी लागू शकते. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर जपून करावा, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले.
सायबर विभागाकडे वर्षभरात २ तक्रारी
साेशल मीडियाचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र सायबर सेल कार्यरत आहे. या विभागाकडे वर्षभरात २ तक्रारी प्राप्त हाेतात. बनावट अकाउंट तयार करून समाजमाध्यमांच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी करणे अशा तक्रारींचा समावेश आहे.
बाॅक्स
...अशी काळजी घ्या
१) एखाद्या मजकुराचा चिकित्सक अभ्यास केल्याशिवाय ताे लाइक, शेअर किंवा फाॅरवर्ड करू नका.
२) आक्षेपार्ह मजकुरावर प्रतिक्रिया देऊ नका.
३) काही व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये दुसऱ्या समाजाविषयी तेढ निर्माण हाेईल, असा आक्षेपार्ह मजकूर सातत्याने टाकला जातो. अशा ग्रुपमधून लेफ्ट हाेणे चांगले.
४) फेसबुकवरील आपले फाेटाे, प्राेफाइल मित्रांव्यतिरिक्त इतरांनी बघू नये यासाठी प्राेफाइल लाॅक करून ठेवा. तेवढीच सुरक्षितता वाढेल.
बाॅक्स
मुलींनो डीपी सांभाळा
व्हाॅटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर समाजमाध्यमांवर मुली स्वत:चे फाेटाे टाकत असतात. या फाेटाेंचा दुरुपयाेग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डीपीवर स्वतंत्र डीपी ठेवताना काळजी घेणे गरजेचे आहे. व्हॉट्सॲपवर डीपी ठेवताना ऑन्ली माय कॉन्टॅक्ट या सेंटिंगचा वापर करावा.
काेट
आपल्या फोटोचा दुरुपयोग टाळण्यासाठी फेसबुकवरील स्वत:ची प्राेफाइल लाॅक करून ठेवावी. जेणेकरून आपली माहिती, फाेटाे इतरांना बघता येणार नाही. एखाद्याचे बनावट अकाउंट तयार करून मित्र असल्याचे भासवून पैशांची मागणी करीत असेल, तर सावध राहावे. आपला मित्र पैशासाठी फाेन करेल, फेसबुकवर कशाला पैशाची मागणी करेल, हा साधा विचार करावा. साध्या-साध्या गाेष्टींकडे लक्ष दिल्यास आपली फसवणूक हाेणार नाही. आक्षेपार्ह मजकूर फाॅरवर्ड करू नये, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले.
लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून, खावी लागू शकते जेलची हवा !
उस्मानाबाद : कधी-कधी एखादी संस्था, नागरिक यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमांवर मजकूर तयार करून टाकला जातो. टाकण्यात आलेला मजकूर खरा की खाेटा, हे तपासण्याची काेणतीही यंत्रणा नाही. या मजकुराची काेणतीही शहानिशा न करता ताे काही नागरिकांकडून फाॅरवर्ड केला जातो. वेळप्रसंगी अशा व्यक्तींना जेलची हवाही खावी लागू शकते. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर जपून करावा, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले.