शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'पाया पडण्यावरुन पवारांचा पाटलांना टोला, स्वत:ला सिंह म्हणणारे सुद्धा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 09:46 IST

उस्मानाबादमध्ये जायचंय तर जा, पण एखाद्याच्या पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका

ठळक मुद्देउस्मानाबादमध्ये जायचंय तर जा, पण एखाद्याच्या पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका

उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दौऱ्यात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. गेले ते इतिहासजमा होतील, असे म्हणत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर टीपण्णी केली. तर, जायचंय तर जा, पण एखाद्याच्या पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका, असे म्हणत उस्मानाबादमध्ये पाटील यांच्यावर निशाणा साधला.  

उस्मानाबाद येथील सभेत पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री म्हणत आहेत, मी पाच वर्षांतील कामांचा हिशेब द्यायला निघालोय. हिशेब लिहिणे चांगलीच गोष्ट आहे... पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका पवार यांनी फडणवीसांवर केली. माजी मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची घडी पुन्हा बसविण्यासाठी शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षांतर केलेल्या नेत्यांवर सडकून टीका केली.

मी आताच्या नेत्यांसारखे पक्षांतर कधी केले नाही़ उलट मी स्वत: नवीन पक्ष काढले. पक्षांतर करणाऱ्यांनी किमान एवढे तरी करून दाखवायचे होते. विकासासाठी नव्हे तर ईडी आणि सेबीच्या भीतीने ते लोक पळत आहेत. 40 वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांना सत्तेत बसविले त्यांना आपल्या भागाचा विकास करून घेता आला नाही, त्यांना आम्ही सन्मान दिला पहिल्या रांगेत बसविले, आता ते अशा ठिकाणी गेलेत जिथे बस म्हटले की बसावे लागते. स्वत:ला सिंह म्हणवून घेणारेदेखील शहांच्या दर्शनाला गेले, असा टोला त्यांनी राणाजगजितसिंह यांना लगावला. दरम्यान, सोलापूर येथील अमित शहांच्या सभेत भाजप प्रवेशावेळी राणाजगजितसिंह यांनी अमित शहांच्या पाया पडून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याची चर्चा उस्मानाबाद जिल्ह्यात रंगली होती. 

राष्ट्रवादीच्या सभेत मनसेचे गाणे !सोलापूर येथेही शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘तुमच्या राजाला साथ द्या हे’ हे गाणे लावण्यात आले होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाOsmanabadउस्मानाबादAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019