उमरग्यात शिवरायांचा शाक्त शिवराज्याभिषेक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST2021-09-25T04:35:41+5:302021-09-25T04:35:41+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकीय आक्रमणातून स्वराज्य निर्माण केल्यानंतर ६ जून रोजी पहिला शिवराज्याभिषेक दिन वैदिक पध्दतीने पार पडला. ...

Shakta Shivrajyabhishek Day celebration of Shivaraya in Umarga | उमरग्यात शिवरायांचा शाक्त शिवराज्याभिषेक दिन साजरा

उमरग्यात शिवरायांचा शाक्त शिवराज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकीय आक्रमणातून स्वराज्य निर्माण केल्यानंतर ६ जून रोजी पहिला शिवराज्याभिषेक दिन वैदिक पध्दतीने पार पडला. यानंतर लगेचच अडीच महिन्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजीराजे यांच्या माध्यमातून वैदिक परंपरेला छेद देत, बहुजनांच्या विचारसरणीचा दुसरा शाक्त राज्याभिषेक केला. २४ सप्टेंबरला निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून रायगडावर हा शाक्त राज्याभिषेक सोहळा पार पडला. याबद्दल येथील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव भास्कर वैराळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने, शहराध्यक्ष अनिल सगर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, नगरसेवक महेश माशाळकर, शहराध्यक्ष विशाल माने, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष रेखाताई पवार, शहर सचिव ज्योतीताई कावळे, एकोंडीच्या शाखाध्यक्ष साधनाताई पवार, तालुका संघटक राऊताई भोसले यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Web Title: Shakta Shivrajyabhishek Day celebration of Shivaraya in Umarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.