शाळकरी बालिकेवर लैंगिक अत्याचार; तरुणी गंभीर जखमी, उस्मनाबादमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 14:05 IST2022-08-31T14:05:01+5:302022-08-31T14:05:07+5:30
उस्मनाबादमधील तुळजापूर शहरालगतच्याच एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता पहिलीत शिकणारी ६ वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी तिच्या घराच्या ...

शाळकरी बालिकेवर लैंगिक अत्याचार; तरुणी गंभीर जखमी, उस्मनाबादमधील घटना
उस्मनाबादमधील तुळजापूर शहरालगतच्याच एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता पहिलीत शिकणारी ६ वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी तिच्या घराच्या पाठीमागील शेतामध्ये शौचास गेली होती. यावेळी दुसऱ्या गावातील माळुंब्रा येथील नराधम अंकुश पोपट वडणे हा तिच्या मागोमाग गेला व त्याने पीडित मुलीचे तोंड दाबून लैंगिक अत्याचार केला. ही बाब तेथेच काम करीत असलेल्या महिलेने पाहिले. तिने आरडाओरडा केली. यानंतर काही ग्रामस्थ जमा झाले व त्यांनी अर्धनग्न अवस्थेतील आरोपीस जागेवरच पकडले. तेथील घटना लक्षात येताच, संतप्त ग्रामस्थांनी आरोपीस चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, पीडित मुलगी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने, उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर लैंगिक अत्याचारासह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोर-पाटील या करीत आहेत दरम्यान, या घटनेतील आरोपीवर यापूर्वीही तामलवाडी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि छेडछाडीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी दिली.