जिल्ह्यातील ८२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:12+5:302021-03-20T04:31:12+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ८२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासंबंधीचा विषय प्रलंबित हाेता. हे शिक्षक सातत्याने पाठपुरावा करीत ...

जिल्ह्यातील ८२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ८२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासंबंधीचा विषय प्रलंबित हाेता. हे शिक्षक सातत्याने पाठपुरावा करीत हाेते. याच अनुषंगाने १९ मार्च राेजी बैठक झाली असता, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी शिक्षणाधिकारी यांना आदेशित केले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघाला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत बारा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पात्र शिक्षकांना चटाेपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी दिली जाते. या नियमानुसार विविध शाळांवरील ८२ शिक्षक सदरील वेतनश्रेणीसाठी पात्र हाेते. परंतु, काहींच्या संचिकांमध्ये त्रुटी निघाल्या हाेत्या. यानंतर संबंधित शिक्षकांनी त्रुटींची पूर्तता करून संचिका दाखल केली. मात्र, यानंतरही काहीच ताेडगा निघाला नाही. वेळाेवेळी पाठपुरावा करूनही आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही. दरम्यान, याअनुषंगाने शिक्षक संघाकडूनही पाठपुरावा करण्यात येत हाेता. असे असतानाच १९ मार्च राेजी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसाेबत बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने प्रलंबित वेतनश्रेणी देण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. चर्चेअंती पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी दिले. यासाेबतच अन्य विषयांवरही जाेरदार चर्चा झाली.
चाैकट...
सीईओंचा सत्कार
वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली काढण्यासाेबतच अन्य मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने सीईओ डाॅ. फड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, सुरेश वाघमारे साहेब, आस्था-लेखा विभागाच्या क्षीरसागर, शिक्षक संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विक्रम पाटील, बिभीषण पाटील, प्रमोद शिंदे, बालाजी भोसले, विकास चव्हाण, कार्याध्यक्ष निजामोद्दीन यांची प्रमुख उपस्थिती हाेती.