ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST2021-05-01T04:31:20+5:302021-05-01T04:31:20+5:30

दिवंगत विजयकुमार बेदमुथा यांनी ‘लोकमत’चे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. याकाळात उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील प्रश्नांसाठी ...

Senior journalist Vijaykumar Bedmutha passes away | ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे निधन

दिवंगत विजयकुमार बेदमुथा यांनी ‘लोकमत’चे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. याकाळात उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील प्रश्नांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या सोलापूर आवृत्ती उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. दरम्यान, पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. किल्लारीच्या भूकंपानंतर तेथे कित्येक दिवस राहून विविध सामाजिक संघटना, जैन समाजाच्या माध्यमातून मदत पोहोचविण्यात ते अग्रेसर होते. या भागाच्या पुनर्वसनासाठीही त्यांनी मोठे प्रयत्न केले. निवृत्तीनंतर पूर्णत: सामाजिक कार्याला वाहून घेत त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून उस्मानाबाद तसेच लातूर जिल्ह्यात जलसंधारणासारखे रचनात्मक कार्य करून दाखविले. त्यांनी जैन समाजाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सामाजिक कार्याद्वारे ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. दिवंगत विजयकुमार बेदमुथा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Senior journalist Vijaykumar Bedmutha passes away