शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नफ्यातील कंपन्या विकल्याने भविष्यात विकसित देश भारतावर वटारतील डोळे: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:22 IST

आपण आपली वडिलोपार्जित संपत्ती किंवा सोने विकतो का? विकत नाही; कारण, वाईट काळात तो शाश्वत दिलासा असतो.

धाराशिव : केंद्र सरकार फायद्यातील कंपन्या विकत आहे. वाईट काळात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी या कंपन्याच शाश्वत संपत्ती म्हणून कामी येणाऱ्या आहेत. मात्र, कुठलाही विचार न करता सरकारने त्यांच्या विक्रीचा सपाटा लावला आहे. देशाच्या भविष्यासाठी हे धोकादायक असून, विकसित देश आपल्यावर डोळे वटारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी धाराशिव येथे झालेल्या सभेतून दिला.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी धाराशिव शहरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले, आपण आपली वडिलोपार्जित संपत्ती किंवा सोने विकतो का? विकत नाही; कारण, वाईट काळात तो शाश्वत दिलासा असतो. आपल्यासोबत ही संपत्ती असल्यास सावकार डोळे वटारू शकत नाही. अशीच स्थिती नफ्यातील कंपन्यांसंदर्भातील आहे. त्यांची विक्री केल्यास भविष्यात विकसित देश आपल्यावर डोळे वटारतील. २०१४ साली देशावर १००ला २६ रुपये असे कर्जाचे प्रमाण होते. सध्याचे सरकार सत्तेत आले आणि आता २०२४ ला हेच प्रमाण ८४ रुपयांवर गेले आहे. अशा स्थितीत देश चालू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.  

भाजपशी घरोबा नाहीच... आपण सेक्युलर मतांवरच निवडून येऊ. भाजपशी अजिबात घरोबा करणार नाही. मुस्लिमसह विविध समाज वंचित आहेत. उमेदवारही वंचित समाजातील आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले. 

आम्हीच मदतीला आलो...उद्धवसेनेबाबत अविश्वास व्यक्त करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धवसेनेला मत म्हणजे भाजपला मत असल्याचे सांगितले. तसेच मागे धाराशिवमध्ये जे गुन्हे दाखल झाले, त्यावेळी काँग्रेस, उद्धवसेना मदतीला आली नाही. वंचित बहुजन आघाडीच युवकांच्या मदतीला आल्याचेही ॲड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर