माणकेश्वरमध्ये माळी, अंधारे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST2021-02-09T04:35:06+5:302021-02-09T04:35:06+5:30
माणकेश्वर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वर्गीय बापूसाहेब अंधारे जनविकास आघाडीच्या मंदाकिनी मधुकर माळी, तर उपसरपंचपदी विशाल दिलीप आंधारे यांची ...

माणकेश्वरमध्ये माळी, अंधारे यांची निवड
माणकेश्वर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वर्गीय बापूसाहेब अंधारे जनविकास आघाडीच्या मंदाकिनी मधुकर माळी, तर उपसरपंचपदी विशाल दिलीप आंधारे यांची बिनविरोध निवड झाली.
येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)साठी आरक्षित होते. ८ फेब्रुवारी रोजी दोन्ही पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सरपंचपदासाठी मंदाकिनी मधुकर माळी तर उपसरपंचपदासाठी विशाल दिलीप अंधारे असे दोनच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी ए.एल. उगलमुगले यांनी माळी यांची सरपंचपदी तर विशाल अंधारे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी दिलीप अंधारे, सुदाम अंधारे, नरसिंह दनाने, सतीश माळी, बबन अंधारे, ग्रामसेवक परदेशी, नूतन सदस्य विशाल कातुरे, मंदाकिनी माळी, नसरीन शेख, नंदा अंधारे, विशाल अंधारे, भाऊसाहेब श्रीरंग अंधारे, श्यामल कोळेकर, कल्याण देवकते, विमल अंधारे, सलमाबिन नासर बादेला, नंदुबाई तेलंगे, सुरेखा अंधारे आदी उपस्थित होते. निवडीनंतर उपस्थितांनी सरपंच, उपसरपंचांचा सत्कार केला.