‘ज्ञानभाग्य’मधील चार विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:21+5:302021-09-17T04:39:21+5:30
ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०१८ ते २०२० पर्यंत प्रताप पोपट काळे, अक्षय राजेंद्र पांचाळ, किरण चंदू आलबत्ते, निखिल ...

‘ज्ञानभाग्य’मधील चार विद्यार्थ्यांची निवड
ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०१८ ते २०२० पर्यंत प्रताप पोपट काळे, अक्षय राजेंद्र पांचाळ, किरण चंदू आलबत्ते, निखिल दयानंद कुंभार यांनी यशस्वीरीत्या वीजतंत्री व्यवसायात प्रशिक्षण घेतले होते. या चार विद्यार्थ्यांची महावितरण व एसटी महामंडळात वीजतंत्री म्हणून नियुक्ती झाली. याबद्दल संस्थेच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य तौफिक शेख, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश घाडगे, आनंद खर्डेकर, आशुतोष बनसोडे आदी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना निदेशक दत्तात्रय कांबळे, दीपक सुतार, संदीप गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. (वा.प्र.)
150921\5555psx_20210915_172155.jpg
ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील चार विद्यार्थ्यांची महावितरण व एसटी महामंडळ विभागात निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला.