बाल वैज्ञानिक समर्थ जरचंद काकनाळे याची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:27+5:302021-01-23T04:33:27+5:30
उमरगा : बालवयातच अनेकांना विविध बाबींचे कौतुक असते. अशा अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना संधी मिळाली आहे. भारतरत्न डॉ. ...

बाल वैज्ञानिक समर्थ जरचंद काकनाळे याची निवड
उमरगा : बालवयातच अनेकांना विविध बाबींचे कौतुक असते. अशा अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना संधी मिळाली आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस इंडिया तर्फे स्पेस रिसर्च चॅलेंज उपक्रमांतर्गत १०० उपग्रह बनविण्याच्या विश्वविक्रमासाठी उमरगा येथील बाल वैज्ञानिक समर्थ जरचंद काकनाळे याची निवड झाली आहे.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने पुणे येथे स्पेस रिसर्च चॅलेंज-२०२१ हा उपक्रम घेण्यात येणार आहे. १०० उपग्रह बनवून रामेश्वरम येथून अंतराळात सोडण्याचा अभिनव प्रयोग करून ७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी इंडिया रेकॉर्ड आशियासह वर्ल्ड रेकॉर्ड,भारताचे उपराष्ट्रपती, तामिळनाडूचे राज्यपाल, अंतराळ संस्थेचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थापित होणार आहे. जगातील किमान २५ ग्रॅम ते कमाल ८० ग्रॅमचे १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर हेलियम बलूनच्या साहाय्याने पृथ्वीच्या सम कक्षेत अवकाशात प्रस्थापित केले जाणार आहेत. या उपक्रमात महाराष्ट्राचे नेतृत्व समन्वय मनिषा चौधरी, सचिव मिलिंद चौधरी करीत आहेत. समर्थ काकनाळे हा ९ वी वर्गातील विद्यार्थी असून उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्राध्यापक जरचंद काकनाळे यांचा समर्थ मुलगा आहे.
चाैकट...
उपग्रह निर्मिती उपक्रमात राज्यातून ३५४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची उपग्रह बनविण्यासंदर्भातील ऑनलाईन प्रशिक्षण जानेवारीत पूर्ण झाले. सर्व १०० उपक्रम एक केसमध्ये फिट करण्यात येणार आहेत. केस सोबत पॅराशूट, जी. पी. एस., ट्रेकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडण्यात येणार आहे. पृथ्वीच्या बाहेरील अवकाशातील प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब, व इतर माहिती पृथ्वीवर पाठविण्यात येणार आहे. यासोबत काही झाडांचे बीज पाठविण्यात येणार आहे.