आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ऊर्जेची बचत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:47+5:302021-03-29T04:18:47+5:30
मुरूम : सध्या शहरीकरणाच्या नावाखाली व मानवाच्या अतिरेकी हव्यासापोटी नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मानवाच्या भविष्यासाठी ...

आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ऊर्जेची बचत करा
मुरूम : सध्या शहरीकरणाच्या नावाखाली व मानवाच्या अतिरेकी हव्यासापोटी नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मानवाच्या भविष्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे, उपलब्ध ऊर्जाशक्तीचा उपयोग योग्य कारणांसाठी करणे, पुरेपूर वापर करून त्याची योग्य ती बचत करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. इंधन हीच खरी राष्ट्राची संपत्ती असून, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ऊर्जेची बचत करा, असे प्रतिपादन केदार खमितकर यांनी केले.
प्रजापिता ब्रह्याकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात पेट्रोलियम एवं प्राकृतिक गॅस मंत्रालय व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (मुरूम) यांच्या संयुक्त विद्यमाने वैश्विक आध्यात्मिक जागृती दिनानिमित्त शुक्रवारी ऊर्जा संवर्धन कार्यशाळा पार पडली. यावेळी ‘भारतीय लोक आणि ऊर्जा व्यवस्थापन’ या विषयावर लातूरचे पीसीआरए संस्थेचे ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी प्रोजेक्टरद्वारे ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वसंत बाबरे होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य काशीनाथ मिरगाळे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे संचालक राजूभाई भालकाटे, सारिकादीदी, करबसप्पा ब्याळे, लातूरचे किरण खमितकर, अनिता मिरकले, अप्पासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती. पाहुण्यांचा परिचय शिल्पा क्षीरसागर यांनी करून दिला. सूत्रसंचालन सहशिक्षक नागनाथ बदोले यांनी केले. आभार रतनभाई पटेल यांनी मानले. सारिकादीदी, सवितादीदी, वैष्णवीदीदी यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.