स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST2021-09-13T04:31:08+5:302021-09-13T04:31:08+5:30
परंडा : काटेरी झाडाझुडपांनी विळखा घातलेल्या कुर्डूवाडी राज्यमार्गावरील बौद्ध स्मशानभूमीच्या परिसराची नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून स्वच्छता करण्यात येत आहे. दोन ...

स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान !
परंडा : काटेरी झाडाझुडपांनी विळखा घातलेल्या कुर्डूवाडी राज्यमार्गावरील बौद्ध स्मशानभूमीच्या परिसराची नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून स्वच्छता करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष सौदागर यांची भेट घेऊन स्मशानभूमीच्या स्वच्छतेची मागणी केली होती. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.
परंडा शहरातून कुर्डूवाडीकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर पूर्व बाजूला बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे. या संपूर्ण परिसराला काटेरी झाडाझुडपांनी विळखा घातलेला आहे. स्मशानभूमीला सुरक्षा भिंतदेखील नाही. शेड नसल्याने अंत्यविधी उघड्यावर उरकावा लागतो. पावसाळ्यात तर मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व समस्या घेऊन बौद्ध समाजाचे शिष्टमंडळ नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या भेटीला गेले होते. सौदागर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर तूर्तास स्मशानभूमीच्या स्वच्छतेचे आदेश पालिकेच्या स्वच्छता विभागाला तत्काळ दिले. शनिवारी सौदागर यांच्या हस्ते साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल बनसोडे, तन्वीर मुजावर, नाना बोराडे, बबलू मुजावर, अरुण बनसोडे, किरण बनसोडे, प्रशांत बनसोडे, अमोल बनसोडे, बालाजी बनसोडे, अक्षय बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, विजय बनसोडे, दादा वडतीले, भारत भोसले, बाळासाहेब बनसोडे, राजू बनसोडे, रोहित बनसोडे, विशाल माने, अंकुश दाभाडे, अजय बनसोडे, बाबा भोसले, विनोद बनसोडे, प्रतीक बनसोडे, रवींद्र बनसोडे, अप्पा बनसोडे, सुजाता बनसोडे, सचिन बनसोडे, आदी समाजबांधव उपस्थित होते.
120921\psx_20210912_102118.jpg
शनिवारी नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्या हस्ते स्मशानभूमीच्या संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेचा शुभारंभ करण्यात आला.