पालेभाज्यांसह टाेमॅटोची कवडीमोल दराने विक्री; गाजराला वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:52+5:302021-01-04T04:26:52+5:30
यंदा मान्सूनमध्ये वार्षिक सरारीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यंदा प्रकल्पात पाणीसाठा वाढला आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व ...

पालेभाज्यांसह टाेमॅटोची कवडीमोल दराने विक्री; गाजराला वाढली मागणी
यंदा मान्सूनमध्ये वार्षिक सरारीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यंदा प्रकल्पात पाणीसाठा वाढला आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्यांच्या लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजारात मागील दोन महिन्यांपासून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी, भाज्यांचे दर उतरले आहेत. मेथी १० रुपयांस ३ जुडी, कोथिंबीर १० रुपयांस २ जुडी, पालक, शेपू, चुका १० रुपयांस २ जुडी विक्री होत आहे. टोमॅटो १०, बटाटा ३०, पत्ताकोबी १०, फ्लाॅवर २०, शिमला मिरची ३०, ककडी २० ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर कांदा ४०, कारले ४०, दोडका ५०, भेंडी ५०, हिरवी मिरची, वांगी ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. थंडीवाढल्याने गाजराला मागणी वाढली आहे. गाजर २० ते ३० रुपये किलोने विक्रीस उपलब्ध होते.
खाद्यतेलाचे दर चढेच
तीन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होत आहे. सोयाबीन तेल ११५ ते १२०, पामतेल ११०, शेंगदाणा तेल १४० ते १५० रुपये किलो विक्री होत आहे. डाळीचे दर स्थिर असून, हरभरा डाळ ५६, तूर डाळ ८८, उडीद डाळ व मूग डाळ ९० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
शेवगा महाग
बाजारात मागील आठ महिन्यांपासून शेवग्याचा तुटवडा कायम आहे. शेवगा ८० ते १०० रुपये किलो विक्री होत आहे. मागणीच्या तुलनेत गवारीची आवक कमी आहे. त्यामुळे गवार ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे. हिरवी मिरची ६० रुपयांनी विक्री झाली.
ॲपल बोराला पसंती
बाजारात बोरांची आवक वाढली आहे. ॲपल बाेर ५०, चमेली बोर ३०, सफरचंद १०० ते १४० रुपये, डाळिंब १२० ते १६० रुपये, संत्रा, चिकू ५० रुपये किलोने विक्रीस आहेत.
एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. लागवडीसाठी १० हजार रुपये खर्च झाला आहे. पावसामुळे नुकसान झाले. सध्या भाव चांगला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघेल.
-प्रदीप सुपेकर, भाजीपाला उत्पादक
बाजारात मागील पंधरा दिवसांपासून बोरांची आवक वाढली आहे. सफरचंद, डाळिंबाचे दर वाढले आहेत. सफरचंद १०० ते १४० रुपये किलोने विक्रीस आहेत.
-समीर बागवान, फळ विक्रेते
एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. लागवडीसाठी १० हजार रुपये खर्च झाला आहे. पावसामुळे नुकसान झाले. सध्या भाव चांगला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघेल.
-प्रदीप सुपेकर, भाजीपाला उत्पादक