रुपामाता ऍग्रोटेक पाडोळीचा रोलर पूजन सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST2021-09-04T04:39:35+5:302021-09-04T04:39:35+5:30
अध्यक्षस्थानी रुपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड पाडोळीकर हे होते. याप्रसंगी बाेलताना त्यांनी कारखान्याच्या मागील कामगिरीचा आढावा मांडला. ...

रुपामाता ऍग्रोटेक पाडोळीचा रोलर पूजन सोहळा उत्साहात
अध्यक्षस्थानी रुपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड पाडोळीकर हे होते. याप्रसंगी बाेलताना त्यांनी कारखान्याच्या मागील कामगिरीचा आढावा मांडला. मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्व शेतकऱ्यांचे हिताला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ह.भ.प. बाबुराव पुजारी आणि ह.भ.प ॲड. पांडुरंग लोमटे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड कारखान्याचे जनरल मॅनेजर गरड, मुख्य सुरक्षा अधिकारी थोडसरे, कृषी अधिकारी कारभारी, चीफ इंजिनिअर शिलवंत, सिव्हिल इंजिनिअर पठाण, हरिदास गुंड, पाडोळीचे उप सरपंच बाबुराव पुजारी, रुपामाता ऍग्रोटेक, रुपामाता मिल्कचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कदम यांनी तर आभार प्रदर्शन गरड यांनी मानले.