‘आरटीई’ प्रवेश परीक्षेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:59+5:302021-02-10T04:32:59+5:30
यंदा एकच साेडत -२६ फेब्रुवारीपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्जउस्मानाबाद -बालकांना माेफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २००९ मधील ...

‘आरटीई’ प्रवेश परीक्षेला सुरूवात
यंदा एकच साेडत -२६ फेब्रुवारीपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्जउस्मानाबाद -बालकांना माेफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २००९ मधील कलम१२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये माेफत २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नाेंदणीला सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
आरटीई प्रवेशपात्र शाळांच्या नाेंदणी २१ जानेवारी ते८ फेब्रुवारी या कालावधीत झाली. ही प्रक्रिया पूर्ण हाेताच ९ फेब्रुवारीपासून विद्यार्यांच्या ऑनलाईन नाेंदणीला सुरूवात झाली आहे. पालकांना आपल्या पाल्यांची नावनाेंदणी २६ फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. ही डेडलाईन सरल्यानंतर म्हणजेच ५ ते ६ मार्च या कालवधीत पहिली साेडत हाेणार आहे. यंदा एकच जाेडत हाेणार आहे. त्यामुळे शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येनुसारच प्रतीक्षा यादी राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. अरविंद माेहरे यांनी दिली.
चाैकट...
तर बीईओंशी साधा संपर्क
आरटई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांना नाेंदणी करताना काही अडचणी आल्यास आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अथवा शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
-डाॅ. अरविंद माेहरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.