कळंब येथे दंगा काबू पथकचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST2021-09-18T04:36:03+5:302021-09-18T04:36:03+5:30
कळंब शहरातील सोनार लाईन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सावरकर चौक, होळकर चौक, ...

कळंब येथे दंगा काबू पथकचा रूट मार्च
कळंब शहरातील सोनार लाईन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सावरकर चौक, होळकर चौक, बागवान चौक, कथले चौक, गांधीनगर, बसस्थानक परिसरासह ग्रामीण भागात मिळून २६ मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने पार पाडण्याकरिता कळंब पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व तयारी केलेली आहे. रूट मार्चदरम्यान लोकांमध्ये जनजागृती करून लोकांना कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले. रूट मार्च व दंगा काबू योजनेकरिता पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. पवार, ए. वाय. पाटील, के. बी. दराडे, ३५ पोलीस अंमलदार व २६ होमगार्ड हजर होते.