‘सिध्दीविनायक ॲग्रीटेक’चे रोलर पूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:41+5:302021-09-11T04:33:41+5:30

श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये व जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल ...

Roller worship of 'Siddhivinayak Agritech' in excitement | ‘सिध्दीविनायक ॲग्रीटेक’चे रोलर पूजन उत्साहात

‘सिध्दीविनायक ॲग्रीटेक’चे रोलर पूजन उत्साहात

श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये व जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. नितीन भोसले यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, श्री सिद्धीविनायक मल्टिस्टेटचे अध्यक्ष व्यंकटेश कोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, तुळजापूर भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, आनंद कंदले, विशाल रोचकरी, प्रभाकर मुळे, सत्यवान सुरवसे, साहेबराव घुगे, दत्ता राजमाने, पं. स. सदस्य चित्तरंजन सरडे, शिवाजी साठे, पिंटू कळसुरे, नांदुरी सरपंच मोहन मुळे, उपसरपंच हनुमंत जाधव, देवकुरूळीचे सरपंच राहुल कलाटे, अनिल जाधव, नागेश चौगुले, बाबा बेटकर, शिवाजी शिंदे, विजय रोकडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी कारखान्याच्या जडणघडणीचा लेखाजोखा मांडला. तुळजापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन या भागात कारखाना उभारण्याचा संकल्प केल्याचे सांगून ऑक्टोबर महिन्यात मोळी पूजनाचा कार्यक्रम घेण्याचा निश्चय व्यक्त केला. सूत्रसंचालन ॲड. प्रतीक देवळे यांनी केले तर आभार बालाजी शिंदे यांनी मानले.

Web Title: Roller worship of 'Siddhivinayak Agritech' in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.