सेवानिवृत्त सैनिकाची खडकी गावातून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:09+5:302021-08-21T04:37:09+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामलवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सलिमा सय्यद ...

Retired soldier marches through Khadki village | सेवानिवृत्त सैनिकाची खडकी गावातून मिरवणूक

सेवानिवृत्त सैनिकाची खडकी गावातून मिरवणूक

googlenewsNext

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामलवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सलिमा सय्यद यांची उपस्थिती हाेती. संतोष नागणे यांनी सैनिक दलात दाखल झाल्यानंतर जवळपास २४ वर्षे सेवा दिल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय झाला हाेता. त्यानुसार, सुरुवातीला खडकी गावातून त्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर गावातील सर्वधर्मीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नागणे यांनी आपल्या सेवाकाळातील विविध अनुभवकथन केले. कार्यक्रमास प्रकाश नागणे, शरीफ मुजावर, अप्पाशा कोरे, दादाराव कांबळे, अशोक जाधव, सुभाष भोसले, अंकुश जवान, धोंडीराम जवान, परमेश्वर शिंदे, शिवाजी जाधव, हनमा शिंदे, अंदापा जवान, बलभीम जाधव आदींची उपस्थिती हाेती.

Web Title: Retired soldier marches through Khadki village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.