सारोळा येथे पीककर्ज नूतनीकरण मेळाव्यास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:17+5:302021-09-23T04:37:17+5:30
सारोळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी हा मेळावा घेण्यात आला. सारोळासह परिसरातील शेतकऱ्यांनी गत दोन वर्षांपासून पीककर्जाचे नूतनीकरण केलेले नाही. ...

सारोळा येथे पीककर्ज नूतनीकरण मेळाव्यास प्रतिसाद
सारोळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी हा मेळावा घेण्यात आला. सारोळासह परिसरातील शेतकऱ्यांनी गत दोन वर्षांपासून पीककर्जाचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे पीककर्ज वाटप करण्यात अडचणी येत असल्याने हा मेळावा घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच प्रशांत रणदिवे व ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण व कृषी सहाय्यक अमोल कानडे यांचा शाल, फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. जवळपास ३० शेतकऱ्यांनी नूतनीकरणासाठी तयारी दर्शविली असून, शुक्रवारी पुन्हा मेळावा घेण्यात येणार आहे. जवळपास २०० शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे मेळाव्यात सांगण्यात आले. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नूतनीकरण करून पीककर्जासह इतर कर्ज व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण यांनी केले. मेळाव्यास पोलीसपाटील प्रीतम कुदळे, भाऊ कासार, उमाकांत मसे, चंद्रकांत देवगिरे, बबलू रणदिवे, शिवाजी मसे, महेश रणदिवे, जोतिराम रणदिवे, काका रणदिवे, दामाजी आगाशे, गोविंद मसे, लक्ष्मण बाकले, राहुल रणदिवे, हुसेन मुजावर, मनोज गाटे, रामलिंग जगदाळे, पांडुरंग रणदिवे, शैलेश शिंदे, बँकेचे राहुल कुंभार, नीलेश जावळे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.