नगर पालिका दस्ताऐवजावर सातबारा नोंदीसाठी भूमकरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:38 IST2018-11-01T16:35:55+5:302018-11-01T16:38:14+5:30
सातबारा मालकी हक्कात नोंद घ्यावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आज सकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़

नगर पालिका दस्ताऐवजावर सातबारा नोंदीसाठी भूमकरांचा मोर्चा
भूम (उस्मानाबाद ) : शहरातील सर्वे नंबर २२१ मध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या जागेची नगर पालिका दस्ताऐवजावर सातबारा मालकी हक्कात नोंद घ्यावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आज सकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़
रमाई अवास योजना, पंतप्रधान आवास योजनेचा या भागातील नागरिकांना लाभ द्यावा, सर्वे नंबर २२१ मध्ये राहत असलेल्या नागरिकांना शासनाच्या सर्व सुविधा पुरवाव्यात, सर्वे नंबर २३१, २३२, २३३ व २३४ यामधील हैद्राबाद कुळकायदा २०१६ प्रमाणे दुरुस्ती करण्यात आलेले कलम ९८ (उ) कमी करण्यात यावे, सोयी-सुविधांबाबत, मागण्यांबाबत पालिकेला आदेशीत करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या़ या मोर्चात नगरसेविका सारिका थोरात, सुनिल थोरात, माजी नगराध्यक्ष संभाजी साठे, सुभाष जावळे, एल़टी़ शिंदे, चोखोबा कांबळे, मुकूंद लगाडे, विष्णू शिंदे, महादेव मांजरे, संजय गायकवाड, के़एऩथोरात, विनायक वाघमारे, जीवन बनसोडे, ज्ञानोबा जाधव, मंगल डाके, युवराज ओव्हाळ यांच्यासह या भागातील नागरिक सहभागी झाले होते़