जिल्हाभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST2021-02-05T08:15:07+5:302021-02-05T08:15:07+5:30
नगर परिषद, उस्मानाबाद उस्मानाबाद : येथील नगर परिषदेत नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ...

जिल्हाभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नगर परिषद, उस्मानाबाद
उस्मानाबाद : येथील नगर परिषदेत नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अभय इंगळे, मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी, यांच्यासह नगरसेवक, गटनेते, सभापती, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो - 27)
शरद पवार हायस्कूल
उस्मानाबाद : येथील शरद पवार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मुख्याध्यापक सुरेश चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक प्रदीप राऊत, तर आभार गुणवंत काळे यांनी मानले.
(फोटो - 27)
सिद्धीविनायक मल्टीस्टेट
उस्मानाबाद : येथील श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेट को- ऑप. क्रे. सोसायटीमध्ये संस्थापक दत्ता कुलकर्णी, संस्थाध्यक्ष व्यंकटेश कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कामटे, राजकुमार जाधव, देवीदास कुलकर्णी, कौस्तुभ दिंडोरे आदी उपस्थित होते.
(फोटो - 27)
जिल्हा मध्यवर्ती बॅंक, उस्मानाबाद
उस्मानाबाद : येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत बॅंकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष कैलास शिंदे, भारत डोलारे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
(फोटो - 27)
शम्सुल उलूम उर्दू माध्यमिक विद्यालय
उस्मानाबाद : येथील शम्स एज्युकेशन सोसायटी संचलित शम्सुल उलूम उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व गुलशन-ए-अतफाल उर्दू प्राथमिक शाळेत संस्थाध्यक्ष शेख लईख अहमद अब्दुल रहिम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव शेख लईख अहमद शब्बीर अहमद, कोषाध्यक्ष मुजीब अहमद, पठाण अकबर जुल्फेखार काजी, मुख्याध्यापिका काजी रेश्मा परवीन, शेख मोहसीन, शेख शागीर्द आदी उपस्थित होते.
(फोटो - 27)
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर
तुळजापूर : तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य जगदे, उपप्राचार्य प्रा. रवी मुदकन्ना, प्रबंधिका सुजाता कोळी यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.