शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

उसतोड कामगारांची नोंदणी करा, उस्मानाबादेत कामगार संघटनेचे हलगीनाद आंदोलन

By सूरज पाचपिंडे  | Updated: October 12, 2022 17:30 IST

राज्यातील अनेक ऊसतोड कामगारांची शासन स्तरावर नोंदणी नाही.

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार बहुल जिल्ह्यातील कामगारांची त्वरीत नोंदणी करुन त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा, या मागणीसाठी तुळजाभवानी कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हलगीनाद आंदोलन केले.  

राज्यातील अनेक ऊसतोड कामगारांची शासन स्तरावर नोंदणी नाही. परिणामी, ऊसतोड कामगार शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे ऊसतोड कामगार व त्यांच्या पाल्यांना हलाखीचे व असुरक्षिततेचे जीवन जगावे लागते. ऊसतोड कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

या ठिकाणी  हलगीनाद आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची त्वरीत नोंदणी करुन शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा, वाहक-चालक यांना विमा योजना लागू करावी, हार्वेस्टरप्रमाणे कामगारांना ऊसतोडणी दर देण्यात यावा, ऊसतोड कामगारांना घरकूल योजनेचा लाभ द्यावा, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरु करावे, अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, संदिप पवार, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, राजु पवार, प्रताप राठोड, रमेश चव्हाण, संजय पवार आदीं पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादSugar factoryसाखर कारखाने