मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सत्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST2021-09-19T04:33:55+5:302021-09-19T04:33:55+5:30
उस्मानाबाद : मराठवाडा मुक्ती दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कोरोनायोद्धा आणि सुंदर माझे कार्यालय उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य ...

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सत्कार सोहळा
उस्मानाबाद : मराठवाडा मुक्ती दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कोरोनायोद्धा आणि सुंदर माझे कार्यालय उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागप्रमुखांचा सत्कार सोहळा पार पडला.
दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून कोरोना महामारी च्या संकटात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य महिला बालकल्याण, पाणी व स्वच्छता मिशन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदे बरोबरच तालुका आणि गाव पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि विभागप्रमुखांचा सत्कार अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी माळी यांनी केले. यावेळी विजय जाधव (उमरगा), डॉ. कुलदीप मिटकरी, डॉ. ऐवाळे, बिभीषण हजारे, कांचन मधुकर कांबळे, मधुकर सदाशिव कांबळे आदींचा कोरोनायाेद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
चाैकट...
यांचाही झाला सन्मान
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. राऊत, बिभीषण हजारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दाताळ, कार्यकारी अभियंता जोशी, नितीन भोसले, शरद माळी, विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे, सांगळे, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, उस्मानाबादच्या गटशिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार, महिला व बालकल्याण अधिकारी बी. एस. निपाणीकर आदींचा ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला.