येडशीत मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:49+5:302021-07-10T04:22:49+5:30

गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शिवाजी चौक ते भवानी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाली तुंबली असून या रस्त्यावर ...

The realm of dirt on the main road to Yedshit | येडशीत मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

येडशीत मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शिवाजी चौक ते भवानी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाली तुंबली असून या रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाणे अवघड झाले असून याबाबत ग्रामपंचायतीला वेळोवेळी कळवूनही प्रश्न सुटत नसल्याने टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष तुषार शिंदे यांनी हा प्रश्न न सुटल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना या गहाण पाण्याने अंघोळ घालण्याचा इशारा ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे गुरुवारी देण्यात आला होता. दरम्यान, ग्रामपंचायतीने पाणी साचलेल्या ठिकाणी मुरुम टाकण्यास सुरुवात केल्याने काहीअंशी प्रश्न सुटला असला तरी या ठिकाणी सिमेंट रस्ता व मोठी गटार होणे गरजेचे असून यावरही काम व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: The realm of dirt on the main road to Yedshit