नवीन आदेशाने वाढणार रेशन, जिल्ह्यात २६ वाढीव रेशन दुकाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:19+5:302021-09-23T04:37:19+5:30
उस्मानाबाद : स्वस्त धान्य दुकानातून विविध धान्याचे वितरण होत असते. या दुकानांची संख्या मर्यादित आहे. आता या दुकानांच्या मदतीला ...

नवीन आदेशाने वाढणार रेशन, जिल्ह्यात २६ वाढीव रेशन दुकाने!
उस्मानाबाद : स्वस्त धान्य दुकानातून विविध धान्याचे वितरण होत असते. या दुकानांची संख्या मर्यादित आहे. आता या दुकानांच्या मदतीला आणखी २६ दुकाने येणार आहेत.
स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर, डाळी अशा वस्तू वितरित होत असतात. प्रत्येक महिन्याला नियोजनानुसार हे वितरण करण्यात येते. शहरी तसेच ग्रामीण भागातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएल शेतकरी कुटुंबांना धान्याचे वितरण केले जात असते. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १०७४ इतकी स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे सुमारे दीडशे दुकाने शहरी भागात आहेत. तर ९२४ दुकाने ग्रामीण भागात आहेत. अनेक वर्षांपासून नवीन रेशन दुकानांना परवानगी दिलेली नव्हती. ती परवानगी आता मिळाली आहे. यासंदर्भात प्रत्येक तालुका स्तरावर किती नवीन दुकानांची गरज आहे याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते. दोन तालुक्यांतून प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत. तर सहा तालुक्यांतून आलेल्या प्रस्तावांपैकी २६ दुकानांना मंजुरी मिळाली आहे.
काय आहेत अडचणी?
मागील काही वर्षांपासून स्थगिती असल्यामुळे निर्णय घेता आला नाही.
शहरी भागात लोकसंख्या वाढली असल्याने त्या भागात दुकानांची वाढ नाही.
धान्यासाठी दूरवरच्या रेशन दुकानात तासन् तास रांगेत थांबावे लागत होते.
कोठे, किती वाढणार दुकाने
उस्मानाबाद ००
तुळजापूर ००
कळंब ६
वाशी २
भूम २
परंडा ९
उमरगा ४
लोहारा ३
गैरसोय दूर होणार
जिल्ह्यात १,०७४ रेशन दुकाने आहेत. नवीन २६ दुकाने वाढल्याने आता दुकानांची संख्या १ हजार १०० होणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांची गैरसोय दूर होऊन धान्य लवकर मिळण्यास मदत होईल.
१०७२
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या
१५० शहरी
९२४ ग्रामीण