शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ लोमटे महाराजांकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:23 IST

गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे जेवण सुरू असल्याने ही महिला एका झाडाखालील ओट्यावर बसली

कळंब (जि. उस्मानाबाद) : दर्शनासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा महाराजांनीच विनयभंग केल्याची घटना गुरुवारी दुपारी मलकापूरच्या मठात घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पहाटे आरोपी महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती. २८ जुलै रोजी ती एकटीच मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली. 

गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे जेवण सुरू असल्याने ही महिला एका झाडाखालील ओट्यावर बसली. तेव्हा एकनाथ महाराजांच्या शिष्याने तिच्याजवळ येऊन महाराजांनी खोलीत बोलविल्याचे सांगितले. आत गेल्यानंतर महाराजांनी शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. यास विरोध केल्यानंतर झोंबाझोंबी व मारहाण करीत त्यांनी महिलेचा विनयभंग केला. आरडाओरडा केल्यामुळे शिष्याने दार उघडले. यावेळी मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्नही महाराजाने केल्याची तक्रार महिलेने येरमाळा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एकनाथ महाराजावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

महाराजांचा शोध सुरू...पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर लागलीच गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महाराज सध्या फरार झाले असून, पोलिसांचे एक पथक त्यांचा माग काढत असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक जी. पी. पुजरवाड यांनी सांगितले.

कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी...पीडित महिला दर्शनासाठी खोलीत गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी या महिलेस शरीरसंबंधाची विचारणा केली. त्यास नकार दिल्यानंतर महाराजांनी मागच्या वेळी पेढा खायला दिल्यानंतर तू झोपली होती, तेव्हा आपण तुझ्यावर बलात्कार व त्याचा व्हिडीओही तयार केल्याचे सांगितले. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी महाराजाने दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस