कळंब : येथील ‘दोस्ती तुटायची नाही’ ग्रुपच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘गप्पा टप्पा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मराठी भाषेचे अभ्यासक प्रा.डॉ.केदार काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य जगदीश गवळी तर रोटरीचे अध्यक्ष डॉ.गिरीश कुलकर्णी, पत्रकार संघाचे विश्वस्त तथा नगरसेवक सतीश टोणगे, दोस्ती ग्रुपचे अशोक चोंदे, रोटरीचे उपप्रांतपाल प्रा.संजय घुले, सुनील हुलसुलकर, शंकर माने, विठ्ठल जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी थोर व्यक्तिमत्त्वांच्या लेखणीतून मराठी भाषेतून उतरलेली शब्दसंपदा ते जागतिक स्तरावरील महत्त्व यावर बोलत, मराठी भाषेचे महत्त्व प्रा.केदार काळवणे यांनी विषद केले. यावेळी सतीश टोणगे, जगदीश गवळी यांनीही संवाद साधला. यानंतर, दोस्ती ग्रुपच्या वतीने मराठीतून स्वाक्षरी या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला.
कळंबमध्ये रंगला ‘गप्पा टप्पा’ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:37 AM