रामेश्वर कोळी यांचा विद्यालयातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:30 IST2021-03-25T04:30:04+5:302021-03-25T04:30:04+5:30

बलसूर : उमरगा येथील कै. शरणप्पा मलंग विद्यालयातील शिक्षक परमेश्वर कोळी यांनी पेट परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने ...

Rameshwar Koli felicitated by the school | रामेश्वर कोळी यांचा विद्यालयातर्फे सत्कार

रामेश्वर कोळी यांचा विद्यालयातर्फे सत्कार

बलसूर : उमरगा येथील कै. शरणप्पा मलंग विद्यालयातील शिक्षक परमेश्वर कोळी यांनी पेट परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पीएच. डी. पूर्व परीक्षेमध्ये कोळी यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पू हत्ते, मुख्याध्यापक अजित गोबरे, कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी उपस्थित होते. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले. आभार विवेकानंद पाचंगे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------

फोटो - परमेश्वर कोळी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. एम. एस. मलंग, अप्पू हत्ते, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी आदी उपस्थित होते.

Web Title: Rameshwar Koli felicitated by the school