राजवीर, ऋषिकेश, सारिकाने पटकाविले विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST2021-02-05T08:14:21+5:302021-02-05T08:14:21+5:30
उस्मानाबाद : अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कासार मॅरेथाॅन स्पर्धेस जिल्हाभरातून लहान मुलांसह ...

राजवीर, ऋषिकेश, सारिकाने पटकाविले विजेतेपद
उस्मानाबाद : अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कासार मॅरेथाॅन स्पर्धेस जिल्हाभरातून लहान मुलांसह युवक, युवती व ज्येष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मॅरेथाॅनमध्ये लहान गटातून राजवीर टंकसाळे, पुरुष गटातून ऋषिकेश नान्नजकर तर महिला गटातून सारिका मोहिरे यांनी विजेतेपद पटकाविले.
रविवारी येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या कासार मॅरेथाॅनचे उद्घाटन मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष गुलचंद व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार जगधने, उपाध्यक्ष संतोष कंदले, सचिव प्रवीण गडदे, युवा जिल्हाध्यक्ष महावीर कंदले, सचिव अमित जगधणे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहलता अंदुरे, दिनेश झरकर, लक्ष्मीकांत हुलजुते आदींची उपस्थिती होती.
सदरील स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना गुलचंद व्यवहारे व राजकुमार जगधने यांनी टी-शर्ट दिले. सचिन कपाळे यांनी अल्पोपाहार व्यवस्था केली. वंदना खोबरे व नितीन कोकीळ यांनी सॅनिटायझर व मास्क वाटप केले. स्पर्धेसाठी आदित्य जगधने, किरण कंदले, सुजित झरकर आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन राजकुमार जगधने, प्रस्तावना गुलचंद व्यवहारे यांनी, तर आभार संतोष कंदले यांनी मानले.
हे ठरले विजेते...
या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या. स्पर्धेत लहान गटातून राजवीर शार्दूल टंकसाळे, पार्थ रवींद्र मोहिरे, निल शार्दूल टंकसाळे व प्राची रवींद्र मोहिरे (सर्व उस्मानाबाद), पुरुष मोठ्या गटात ऋषिकेश राजाभाऊ नान्नजकर, नीलेश नरहरी नान्नजकर, प्रसाद पंडित नान्नजकर (सर्व कळंब), महिला गटातून सारिका रवींद्र मोहिरे, प्रियंका संतोष सातपुते, प्रीती अदित्य जगधने (सर्व उस्मानाबाद) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले. आयोजक गटातून गुलचंद व्यवहारे (तुळजापूर), संतोष सातपुते (उस्मानाबाद), प्रमोद पोते (कळंब) आहेत.
फोटो कॅप्शन -
कासार मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांसह गुलचंद व्यवहारे, राजकुमार जगधने, स्नेहलता अंदुरे आदी.